---Advertisement---

अवैध वाळू वाहतूक करण्यास पकडले!

---Advertisement---
अमळनेर : पांझरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करताऱ्यास मारवड पोलिसांनी आज सकाळी ७ वाजता अटक केली. त्याच्याकडून ट्रॅक्टरसह वाळू असा ३ लाख ३ जार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असू त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील व पोलीस उज्वल पाटील हे आज सकाळी ७ वाजता बेटावदकडून भरवस गावाकडे येताना त्यांना ट्रॅक्टर क्र. एम एच १९ , एम ४९४ वाळू वाहतूक करताना आढळून आले. हे ट्रॅक्टर बाळा उर्फ गिरीश जयवंतराव पाटील रा बेटावद ता शिंदखेडा याचे असल्याचे समजले. पोलिसांनी ट्रॅक्टर , ट्रालीसह वाळू मारवड पोलीस स्टेशनला  जप्त करण्यात आले असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment