तरुण भारत लाईव्ह । १२ मे २०२३। सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसई चा निकाल शुक्रवारी सकाळी जाहीर झाला. cbse.gov.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही निकाल पाहू शकता. निकाल कसा तपासायचा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
या वर्षी दहावी आणि बारावीचे एकूण 39 लाख (38,83,710) विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होते, ज्यामध्ये दहावीच्या 21 लाख (21,86,940) आणि बारावीच्या सुमारे 17 लाख (16,96,770) विद्यार्थ्यांचा समावेश होता.
असा पहा निकाल
सर्वप्रथम, CBSE च्या अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in ला भेट द्या. त्यानंतर मेन पेजवर, ‘CBSE बारावी निकाल डारेक्ट लिंक’ वर क्लिक करा. लॉगिन पेज ओपन होईल, इथे विद्यार्थ्यांनी त्यांना रोल नंबर आणि जन्मतारीख एन्टर करावी. तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर दिसेल, तो तपासा. विद्यार्थी इथून निकालाची डिजिटल प्रत डाऊनलोड करू शकतात आणि त्यांच्याकडे ठेवू शकतात.
दरम्यान, CBSE इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 33 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. प्रात्यक्षिक आणि थिअरी या दोन्ही परीक्षांमध्ये किमान 33 टक्के गुण असणं आवश्यक आहे.