नवी दिल्ली : देशात सध्या CBSE बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. यादरम्यानच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) देशातील सुमारे 20 शाळांची मान्यता रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील दोन शाळांचा समावेश आहे. CBSE बोर्डाने काही शाळांची अचानक तपासणी केल्यानंतर अनेक गैरप्रकार उघडकीस आले. या शाळांनी नियमांकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना डमी प्रवेश दिला आहे असे या तपासणीत उघड झाल्याने त्या शाळांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
CBSE चे सचिव हिमांशू गुप्ता यांनी सोशल माध्यम X वर याची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बोर्डाने देशभरातील CBSE शाळांमध्ये आकस्मिक तपासणी केली. शाळा संलग्नता आणि परीक्षा उपनियमांमध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदी आणि निकषांनुसार या शाळा चालवल्या जात आहेत की नाही याची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीत काही शाळा डमी विद्यार्थी आणि अपात्र विद्यार्थी सादर करून विविध गैरप्रकार करत असल्याचे उघड झाले. सखोल चौकशीअंती मान्यता रद्द करून पुढील शाळांची पदोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
मान्यता काढून घेण्यात आलेल्या शाळांची यादी
- प्रिन्स यूसीएच माध्यमिक विद्यालय, सीकर
- राजस्थान ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, जोधपूर
- राजस्थान द्रोणाचार्य पब्लिक स्कूल, रायपूर, छत्तीसगड
- विकॉन स्कूल, विधानसभा रोड, रायपूर
- करतार पब्लिक स्कूल, कैथ्या, जम्मू आणि काश्मीर
- राहुल इंटरनॅशनल स्कूल, ठाणे, महाराष्ट्र
- पायोनियर पब्लिक स्कूल, पुणे, महाराष्ट्र
- SAI RNS अकादमी, दिसपूर, गुवाहाटी, आसाम
- सरदार पटेल पब्लिक स्कूल, मिसरोद हुजूर, भोपाळ, मध्यप्रदेश
- लॉयल पब्लिक स्कूल, बुलंदशहर, उत्तर प्रदेश
- ट्रिनिटी वर्ल्ड स्कूल, गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश
- क्रिसेंट कॉन्व्हेंट स्कूल, गाझीपूर, उत्तर प्रदेश
- पीव्हीएस पब्लिक स्कूल, मलप्पुरम, केरळ
- मदर तेरेसा मेमोरियल सेंट्रल स्कूल, तिरुवनंतपुरम, केरळ
- ज्ञान आइन्स्टाईन इंटरनॅशनल स्कूल, डेहराडून, उत्तराखंड
- सिद्धार्थ पब्लिक स्कूल, दिल्ली – 41
- भारत माता सरस्वती बाल मंदिर, दिल्ली – 40
- नॅशनल पब्लिक स्कूल, दिल्ली – 40
- चांद राम सार्वजनिक वरिष्ठ माध्यमिक. शाळा, दिल्ली – 39
- मॅरीगोल्ड पब्लिक स्कूल, दिल्ली – 39