CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; असा पहा निकाल

तरुण भारत लाईव्ह । १२ मे २०२३। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. CBSE ने 5 एप्रिल 2023 रोजी 10वी साठी CBSE बोर्ड परीक्षा 2023 ही परीक्षा घेण्यात आली होती.

ऑनलाइन कसा पहाल?
cbse.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला किंवा त्यांची वेबसाइट cbseacademic.nic.in ला भेट द्या. त्यानंतर  होमपेजवर, CBSE 10वी निकाल 2023 लिंक उघडा. आवश्यक माहितीनुसार आपले लॉगिन तपशील इंटर करा.  तुमचा डिटेल्स तपासा आणि डाउनलोड पर्याय निवडा.

त्याप्रमाणे 10 वीचा निकाल डिजीलॉकर, तसेच अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर देखील पाहाता येणार आहे. तसेच विद्यार्थी त्यांचा निकाल डाऊनलोड देखील करू शकतात.

२०२२ मध्ये दहावीच्या एकूण 64,908 विद्यार्थ्यांनी 95% आणि त्याहून अधिक गुण मिळवले, तर 2,36,993 विद्यार्थ्यांनी 90% आणि त्याहून अधिक गुण मिळवले.