ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; २६६ जागांसाठी भरती

#image_title

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी पदभरती जाहीर करण्यात आलीय. आज म्हणजेच २१ जानेवारीपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. विशेष पदवी पास असलेला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.

ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-१ पदासाठी ही भरती होत आहे. या भारतीमार्फत एकूण २६६ जागा भरल्या जाणार आहे. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार असून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२५ ही आहे.

भरतीसाठी आवश्यक पात्रता :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. मेडिकल, इंजिनियरिंग आणि सीए पदवी प्राप्त उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अर्जदाराचे वय २१ ते ३२ वर्षांमध्ये असावे.

अर्ज शुल्क :
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क जमा करायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना १७५ रुपये शुल्क भरायचे आहे.

पगार : 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920/-
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन क्लिक करावे लागेल.
Click here for New Registration यावर क्लिक करायचं आहे.
यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर सर्व माहिती भरावी.
यानंतर सही आणि फोटोग्राफ अपलोड करायचे आहे.
यानंतर शुल्क भरायचे आहे.यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.
फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.