सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पदवी उत्तीर्णांसाठी 5000 जागांवर भरती, फटाफट करा अर्ज

तरुण भारत लाईव्ह । बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने पदवी उत्तीर्णांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. अप्रेंटिस पदाच्या तब्बल 5000 जागा भरण्यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवाराने 21 एप्रिल 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता :   मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

वयाची अट: 31 मार्च 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी : 

PWBD उमेदवारांना 400 रुपये
SC, ST आणि महिला उमेदवारांना अर्जासाठी 600 रुपये
इतर सर्व उमेदवारांना अर्जासाठी 800 रुपये भरावे लागतील.

तुम्हाला किती पगार मिळेल
या पदांद्वारे देशभरातील अनेक राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे. उमेदवार ज्या शाखेत निवडला जाईल त्यानुसार वेतन मिळेल. उदाहरणार्थ, ग्रामीण आणि निमशहरी शाखेसाठी वेतन 10,000 रुपये आहे. शहरी शाखेसाठी पगार 15,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे मेट्रो शाखेसाठी दरमहा 20 हजार रुपये पगार आहे.

या वेबसाइटवरून अर्ज करा
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शिकाऊ पदासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठी, उमेदवारांना सेंट्रल बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, ज्याचा पत्ता आहे – centerbankofindia.co.in.

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल. याबद्दल नवीनतम अद्यतने मिळविण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट तपासत रहा.

शुद्धीपत्रक: पाहा

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा