---Advertisement---
July DA Hike News : केंद्र सरकार रक्षाबंधनापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता आहे. जुलै २०२५ मध्येच कर्मचाऱ्यांना सरकार ३-४ टक्के महागाई भत्ता देण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी मार्चमध्ये महागाई भत्ता २ टक्के वाढवण्यात आला होता, त्यानंतर तो आता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के झाला आहे.
महागाई लक्षात घेऊन, मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता देते. पहिला १ जानेवारीपासून आणि दुसरा १ जुलैपासून लागू होतो. मार्चमध्ये जाहीर झालेला भत्ता १ जानेवारीपासून लागू मानला जातो. आता जो जाहीर तो १ जुलै २०२५ पासून प्रभावीपणे मानले जाईल. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना डीआर दिला जातो.
कसा ठरवला जातो महागाई भत्ता
औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-IW) च्या डेटाच्या आधारे DA मोजला जातो. देशातील ८८ औद्योगिक केंद्रांच्या ३१७ बाजारपेठांमध्ये प्रचलित असलेल्या किरकोळ किमतींच्या आधारे AICPI-IW निर्देशांक जारी केला जातो. यानंतर, सरकार DA सुधारित करण्यापूर्वी गेल्या सहा महिन्यांचा डेटा पाहते.
मार्च २०२५ मध्ये AICPI-IW १४३ होता, जो मे २०२५ पर्यंत १४४ पर्यंत वाढला आहे. यामुळे महागाई भत्त्यात ३-४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ज्याची गणना सूत्रानुसार करता येते. यामध्ये, वेळेच्या आधारे गणना केली जाते. महागाई भत्ता (%) = [(गेल्या १२ महिन्यांची CPI-IW सरासरी २६१.४२) ÷ २६१.४२] × १००
तथापि, मे २०२५ चा CPI-IW डेटा सरकारने जारी केलेला नाही. जर सरकारने तो डेटा जारी केला आणि महागाई स्थिर राहिली किंवा त्यात काही वाढ झाली. तर रक्षाबंधनापूर्वी सरकार महागाई भत्ता वाढवू शकते.