मोठी बातमी! मध्य रेल्वेचं प्रवाशांना सर्वात मोठं गिफ्ट, आता गर्दीतून होणार सुटका

---Advertisement---

 

भुसावळ : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, अकोला तसेच भुसावळ मार्गावर विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

यात पुणे-नागपूर ही विशेष गाडी १ ऑक्टोबर रोजी दुपारी २:५० वाजता पुणे येथून सुटेल; दुसऱ्या दिवशी सकाळी ७:३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. परत २ रोजी नागपूरहून रात्री ११ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४:२० वाजता पुणे पोहोचेल.

या गाडीला भुसावळसह १६ प्रमुख थांबे आहेत. नाशिकरोड-नागपूर ही विशेष गाडी १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान नाशिकरोड येथून सायंकाळी ६ वाजता सुटेल; दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या गाड्या नागपूर-नाशिकरोड मार्गावरही चालतील.

भुसावळ-नागपूर विशेष गाडी २ ते ४ ऑक्टोबर २०२५ रोजी भुसावळ येथून सकाळी ५ वाजता सुटेल; त्याच दिवशी दुपारी १२:२० वाजता नागपूर पोहोचेल. परतीची गाडी नागपूर-भुसावळ मार्गावरही चालवली जाईल. या विशेष गाड्यांमध्ये प्रामुख्याने सामान्य द्वितीय श्रेणीच्या कोचेससह लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आहेत.

मुंबई-नागपूर ही विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजता खाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:१० वाजता नागपूर पोहोचेल. परतीची गाडी २ ऑक्टोबर रोजी नागपूरहून रात्री १०:३० वाजता सुटेल; दुसऱ्या दिवशी मुंबईत पोहोचेल.

नागपूर-अकोला ही विशेष गाडी २ ऑक्टोबर रोजी नागपूरहून सायंकाळी ६:४० वाजता रवाना होईल तर अकोला येथे रात्री ११:३० वाजता पोहोचेल. परतीची गाडी ३ ऑक्टोबर रोजी अकोला येथून मध्यरात्री १२:२० वाजता रवाना होऊन त्याच दिवशी नागपूरला पोहोचेल.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---