केंद्राचं उत्तर महाराष्ट्राला मोठं गिफ्ट ; मनमाड-जळगाव चौथी लाईन तर भुसावळ-खंडवा तिसऱ्या लाईनला मंजुरी

जळगाव/नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारनं उत्तर महाराष्ट्राला मोठं गिफ्ट दिल आहे. नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन मल्टी-ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव- मनमाड चाैथ्या रेल्वेलाइनला मंजुरी देण्यात आली. याव्यतिरिक्त भुसावळ-खंडवा तिसऱ्या व चौथी लाइन तसेच माणिकपूर-इरादतगंज तिसरी लाइनलाही मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी, मंत्रिमंडळाने 3 मल्टीट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्यासाठी एकूण 7927 कोटी रुपये मंजूर केले आहेत. प्रवास सुकर करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल, तेलाची आयात कमी होईल आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनही कमी होईल, ज्यामुळे रेल्वे नेटवर्क अधिक चांगले आणि पर्यावरणपूरक होईल अशी अपेक्षा आहे.

मनमाड-जळगाव 160 किलोमीटर मार्गाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यासाठी 2773 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. भुसावळ-खंडवा दरम्यान 131 किलोमीटरच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाला मंजुरी देण्यात आली. गेला. त्यासाठी 3514 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. प्रयागराज-माणिकपूर दरम्यान 84 किलोमीटरच्या तिसऱ्या मार्गाला मंजुरी देण्यात आली. यासाठी 1640 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.