जळगाव । जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनची साखळी खेचून तब्बल अर्धा तास दगडफेक करण्यात आली. ही घटना अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीजवळ घडली आहे.या दगडफेकीमुळे पॅसेंजर मध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचा एक व्हिडिओ हा सोशल मीडियाचा व्हायरल झाला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, १२ जुलै रोजी अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने हजारो भक्तांची रेल्वेमध्ये गर्दी होती. भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून 11 वाजता सुटली. या रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले होते. भोरटेक रेल्वेस्टेशन पूर्वी काही यात्रेकरूंनी धार टेकडीजवळ साखळी ओढत रेल्वेला थांबवले.
यानंतर हजारो यात्रेकरू त्याठिकाणी उतरले. यावेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर तब्बल अर्धा तास दगडफेक केली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे प्रवासी चांगलेच धास्तावल्याचे दिसून आले.