उद्धव ठाकरेंच्या पाचोऱ्यातील सभेत खुर्च्या रिकाम्या?

जळगाव : पाचोरा येथे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सभा सुरु आहे. मात्र,  याच सभेत खुर्च्या रिकाम्या असल्याचं वृत्त समोर आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.  दरम्यान, या सभेपूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहावयास मिळाले. सभेत घुसून दाखवा असे आव्‍हान दिल्‍यानंतर गुलाबराव पाटील यांचे समर्थक त्‍यांचा मुखवटा घालून पाचोरा गाठलं.  मात्र पोलिसांनी त्यांना रोखले, यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

गेल्या दोन दिवसापासून मंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडत असल्याचं पाहायला मिळत असून एकमेकांना आव्हान दिले जात आहे. संजय राऊत यांनी चौकटीत बोलावे नाहीतर आपण सभेत घुसू, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर संजय राऊत यांनीही सभेत येऊन दाखवा अस आव्हान दिले होते. त्यांच्या या आवाहनानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांचे शेकडो कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या पाचोरा येथील सभेसाठी रवाना झाले होते. संजय राऊत यांनी जळगावमध्ये येऊन गुलाबी गँग असा उल्लेख केला होता. हा महिलांचा अपमान असल्याचं सांगत शिंदे गटाच्या शेकडो महिला कार्यकर्त्या या पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी रवाना झाले.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखल
संजय राऊत यांनीही सभेत येऊन दाखवा अस आव्हान दिले होते.  त्यांच्या या आवाहनानंतर मंत्री  गुलाबराव पाटील यांचे समर्थक त्‍यांचा मुखवटा घालून पाचोरा गाठलं.  मात्र पोलिसांनी त्यांना रोखले, यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता.

दरम्यान,  शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सभा सुरु झाली असून सभेत खुर्च्या रिकाम्या असल्याचं वृत्त समोर आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.