चाळीसगाव । आरशासमोर उभे राहून गावठी कट्ट्याशी खेळणे चाळीसगावच्या एक तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. गावठी कट्ट्याशी खेळत असताना बंदुकीतून चुकून गोळी झाडली गेल्याने ती थेट तरुणाच्या गालात घुसली. मंजितसिंग दिलीपसिंग बावरी (वय २०) असे या तरुणाचे नाव असून यात तो जखमी झाला आहे. त्याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
या घटनेने बाबत असे की, चाळीसगाव शहरातील बस स्टॅण्डच्या पाठीमागे मंजितसिंग बावरी हा त्याची आई व बहीणीसह भाड्याने राहतो. शुक्रवारी सकाळी मंजितसिंग हा त्याच्या हातातील बंदुक ही आरशात बघुन वेगवेगळ्या स्टाईलने हवेत फिरवित होता. त्यावेळी बंदुकीतील गोळी चुकून झाडली गेल्याने ती थेट गालात घुसली आहे.
यावेळी वेळी घरातून जोरात फटाका फुटल्यासारखा आला. तेव्हा मित्र व वडील हे घरात पळत गेले असता, मंजितसिंग हा आरशा समोर गुडघे जमिनीवर टेकून डाव्या गालाला हात लावून खाली बसलेला होता. तसेच डाव्या गालातून रक्त येत होते. मित्राने लागलीच त्याच्या आई व बहीणीस बोलावुन घेतले व त्यांना झालेला प्रकार सांगितला. यानंतर त्याला देवरे हॉस्पिटल येथे उपचाराकामी घेऊन गेले. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिसांनी रुग्णलयात धाव घेवून घटनेची माहिती घेतली.
याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला पो. उपनिरिक्षक कैलास राजधर पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि. योगेश माळी करीत आहेत. दरम्यान मंजित याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस दलाकडून मिळाली