Chalisgaon Crime : एकावर तीक्ष्ण हत्याराने वार; गुन्हा दाखल

---Advertisement---

 

चाळीसगाव : दूध डेअरीवर दूध घेऊन घराकडे पायी जात असणाऱ्या इसमावर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून एकास गंभीर जखमी केल्याची तालुक्यातील हिरापूर येथे दि. १४ रोजी रात्री ८ ते ८:३० वाजेच्या दरम्यान घडली.

महेंद्र भास्कर निंकुभ (हिरापूर, ता. चाळीसगाव) हे गावातील दूध डेअरीवर दूध घेऊन घराकडे गल्लीतून पायी परतत असताना पंतीग निकुभ यांच्या घराजवळ दुचाकीवर अर्जुन भगवान पारधी व सोनू गोकुळ पावले (दोघे हिरापूर, ता. चाळीसगाव) हे दुचाकीवरून आले व काहीएक कारण नसताना दुचाकीमागे बसलेल्या सोनू पावले याने त्याच्या हातातील तीक्ष्ण हत्याराने महेंद्र निकुंभयांच्या डोक्याच्या मागील बाजूस मारून त्यांना जखमी केले व दोघे दुचाकीवरून पळून गेले.

या हल्ल्यात निकुंभ यांना जबर मार लागून डोक्यातून रक्तस्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी चाळीसगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अर्जुन भगवान पारधी व सोनू पावले यांच्याविरोधात ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---