झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी आज नव्या पक्षाची घोषणा केली आहे. भाजपसोबत जाणार अशी आधी चर्चा होती. पण त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मी राजकारणातून संन्यास घेणार नाहीये. आता त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. आम्ही आमची स्वतःची संघटना बनवू. आमच्यासारख्याच विचारसरणीचा नवा जोडीदार मिळाला तर आम्ही त्याच्यासोबत पुढे जाऊ. ही जनतेची मागणी आहे, असं चंपाई सोरेन यांनी म्हटलं आहे.
चंपाई सोरेन म्हणाले की, “आम्ही दिल्लीत कोणत्याही भाजप नेत्याला भेटलो नाही. मी मुलाला आणि नातवाला भेटायला गेलो होतो. आरशाप्रमाणे आपण आपले विचार लोकांसमोर ठेवले आहेत. आदिवासी, दलित आणि गरिबांसाठी आम्ही पूर्वीपासून लढत आलो आहोत. भविष्यातही ते करणार. लोकांना त्यांचे हक्क मिळवून देणार. आम्ही एक नवीन सुरुवात केली आहे.
चंपाई सोरेन हे झारखंडच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. 1990 च्या दशकात त्यांनी वेगळ्या राज्याच्या लढ्यात भाग घेतला. त्यांच्या योगदानासाठी त्यांना ‘टायगर ऑफ झारखंड’ असे नाव देण्यात आले. 2000 मध्ये बिहारच्या दक्षिणेकडील भागापासून वेगळे करून झारखंडची निर्मिती करण्यात आली.