Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसंदर्भात आज २९ रोजी आयसीसीची महत्त्वपूर्ण बोर्ड बैठक होत आहे. आज दुपारी 2:30 वाजता तर भारतीय वेळेनुसार, 4 वाजता आयसीसी बोर्डाची बैठकी होईल. त्यात या नाट्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्याबाबत आयसीसीच्या बैठकीत तीन पर्यायांवर विचार केला जाऊ शकतो. त्याचा पहिला पर्याय हायब्रिड मॉडेल आहे, ज्या अंतर्गत टीम इंडिया वगळता सर्व संघांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील.
दुसऱ्या पर्यायामध्ये ही स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानबाहेर खेळवली जाणार असून ती हलवण्याची चर्चा आहे. मात्र, या कालावधीतही होस्टिंगचे अधिकार पीसीबीकडेच राहतील. तिसरा आणि शेवटचा पर्याय म्हणजे संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जावी, पण भारत त्यात सहभागी होणार नाही.
दरम्यान, पीसीबी अध्यक्षांनी भारताच्या भूमिकेवर काल टीका केली होती. सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात आली असताना भारत सातत्याने सामने खेळवण्यास नकार देत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारत या सामन्यात खेळला नाही तर ही नाराजी आयसीसीला पण भोवू शकते, असा दावा करण्यात येत आहे.