Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत सुरू असलेला वाद अद्याप संपलेला नाही. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
पाकिस्तान ‘चॅम्पियन्स ट्रॉफी 2025’ आयोजित करणार आहे; परंतु सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला जाण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नकार दिला होता. हायब्रीड मॉडेलच्या धर्तीवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करा अन्यथा स्पर्धेतून बाहेर पडण्यास तयार राहा, असा सज्जड इशाराच आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला दिला होता. आतापर्यंत पीसीबी हायब्रीड मॉडेल नाकारत होते, पण आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेल स्वीकारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट मंडळ पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास तयार आहे. यानुसार चॅम्पियन ट्रॉफीचे सामने भारत दुबईमध्ये सामने खेळेल; परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डने अशी अट ठेवली आहे की, आयसीसीचे हे धोरण 2031 पर्यंत सुरू ठेवेल. तसेच हा नियम त्याच्या सर्व स्पर्धांना लागू होईल.
पीसीबीच्या अटी…
भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला नाही, तर अंतिम सामना लाहोरमध्ये खेळवण्यात यावा.
भारताय होणाऱ्या आयसीसी स्पर्धाही हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात याव्या, तरच पाकिस्तान सहभाग घेईल.