Champions Trophy 2025 Schedule Announced : भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला आमने-सामने

Champions Trophy 2025 Schedule Announced :  चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. हायब्रिड मॉडेलमुळे भारत-पाकिस्तान सामन्याचे केंद्र दुबई असेल, ज्यामुळे या सामना विशेष लक्षवेधी ठरणार आहे.

वेळापत्रकातील ठळक मुद्दे 

गट अ: पाकिस्तान, भारत, बांगलादेश, न्यूझीलंड.
गट ब: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान.

हायब्रिड मॉडेलचे महत्त्व 

आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीचा विचार करता, भारत आणि पाकिस्तानमध्ये सामंजस्य साधण्यासाठी हायब्रिड मॉडेल एक महत्त्वपूर्ण उपाय ठरले आहे. हे मॉडेल क्रिकेटच्या सार्वत्रिक पसराला चालना देण्यास मदत करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांचे हे आयोजन क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरेल!

ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक

१९ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची

२० फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

२१ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची

२२ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

२३ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

२४ फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी

२५ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी

२६ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

२७ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी

२८ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

१ मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची

२ मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

४ मार्च – उपांत्य फेरी १, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

५ मार्च – उपांत्य फेरी २, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

९ मार्च – फायनल – गद्दाफी स्टेडियम, लाहोर

 

उपांत्यपूर्व १ मध्ये भारत पात्र ठरला तर तो सामना दुबईत होईल.

पाकिस्तान पात्र ठरल्यास उपांत्य फेरी २ सामना लाहोर येथे होईल