Champions Trophy 2025 । BCCE ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेबाबत निर्णय जाहीर केल्यापासून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
बीसीसीआयच्या या निर्णयावर संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर तनवीर अहमदने सर्व मर्यादा ओलांडल्या असून अपशब्दांचा अवलंब केला आहे. सोशल मीडियावर त्याने उघडपणे आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे.
काय म्हणाला तनवीर अहमद ?
‘बीसीसीायने आपल्या हातात बांगड्या भराव्या’ असं त्याने म्हटलं आहे. तो एवढयावरच थांबला नाही, भारतीय क्रिकेट बोर्डाबद्दल खोटारडे, नीच, बदमाश आणि दुटप्पी असे आपत्तीजनक शब्द वापरले. बीसीसीआयपेक्षा एका गाढवावर विश्वास ठेवणं केव्हाही चांगलं. तो फसवणार नाही असं तनवीर अहमद म्हणाला. त्याने पाकिस्तानी मीडियाला भारतीय मीडियाला बोलवू नका असं अपील केलं.
दरम्यान, BCCI च्या या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतासोबत कुठल्याही टुर्नामेंटमध्ये न खेळण्याची धमकी दिली होती. पीटीआयच्या रिपोर्ट्नुसार 12 नोव्हेंबरला ICC ला एक ईमेल पाठवण्यात आला. त्यात टीम इंडियाला न पाठवण्यामागची भारतीय क्रिकेट बोर्डाने ठोस कारणं सांगावी, असं म्हटलं होतं.
आयसीसीची सर्व टीम्ससोबत चर्चा सुरु आहे. टुर्नामेंटच्या शेड्युलबद्दलही चर्चा आहे. आयसीसीने बॅकअप प्लान म्हणून दक्षिण आफ्रिकेत टुर्नामेंट आयोजित करण्याचा प्लान तयार ठेवल्याच काही रिपोर्ट्समध्ये म्हटलय.