चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, याची उत्सुकता भारतीय क्रिकेट चाहत्यांना लागली असून, श्रेयस अय्यरचं नाव निच्छित मानलं जात आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या ICC टुर्नामेंटसाठी संघाची घोषणा 12 जानेवारी रोजी होणार आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरने जे प्रदर्शन केले आहे, त्यामुळे त्याच्या भारतीय संघात समाविष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत त्याने 5 टुर्नामेंट्समध्ये 1341 धावा फटकावल्या आहेत.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबरदस्त प्रदर्शन
श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पाच सामन्यात 325 च्या सरासरीने 325 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. त्याचा सर्वोत्तम स्कोर 137 धावा आहे, आणि त्याच्या शानदार फॉर्मने क्रिकेट प्रेमींना चकीत केलं आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये अय्यरचा उत्कृष्ट प्रदर्शन
विजय हजारेच्या तसचं, रणजी ट्रॉफीमध्येही श्रेयसने चार सामन्यात 90.40 च्या सरासरीने 452 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे, एक डबल सेंच्युरीसह. या फॉर्ममुळे तो भारतीय टीमसाठी एक प्रमुख दावेदार बनला आहे.
अन्य स्पर्धांमध्ये सुद्धा प्रभावी खेळ
श्रेयस अय्यरने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 188.52 च्या स्ट्राइक रेटने 345 धावा फटकावल्या आहेत, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले.
संपूर्ण देशांतर्गत क्रिकेटमधील अय्यरची कामगिरी
श्रेयस अय्यरने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटच्या पाच मोठ्या स्पर्धांमध्ये 1341 धावा केल्या आहेत. त्याचा फॉर्म पाहता, तो 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा एक प्रमुख सदस्य होऊ शकतो.