आणखी दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

तरुण भारत लाईव्ह । ८ एप्रिल २०२३। मार्च महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला होता तब्बल चार वेळा पावसाने रब्बीच्या पिकांचे नुकसान केले शुक्रवारी सायंकाळी जामनेर तालुक्यातील तोंडापूर वाकडी पासून फरदापुर पर्यंत वादळी पाऊस आणि गारपीट झाली त्यात अनेक घरांपर्यंत पत्रे वाऱ्याने उडून गेली मग काय ज्वारीचे पिके आडवी पडली आहेत एरंडोल तालुक्यातील तळी परिसरात सकाळच्या वेळी पाऊस झाला तर अन्य ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढलेला होता.

दरम्यान जिल्ह्यात  अजून दोन दिवस जोरदार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तोंडापूर परिसरात वादळ पावसाला सुरुवात झाली मध्येच पाच ते दहा मिनिटे गारपिट झाले अर्धा तास झालेला पावसामुळे तोंडापूर का भात रस्ते शेतात पाणी साचले होते तोंडापूर, कुंभारी, वरखेडी, फरदापुर, भारुड, खेरा, वाकोद, मांडवे, वाकडी, हिवरखेडे, या गावांमध्ये वादळी पाऊस झाला जिल्ह्यात ८ ते ९ एप्रिल रोजी वादळी पावसाचा अंदाज वर वर्तविण्यात आला आहे.

१२ एप्रिल पर्यंत वातावरण ढगाळ असेल १३ आणि १४ तारखेला जिल्हा तापमान ४० अंश सेल्सिअस मध्ये जाऊन उष्णतेची लाट येण्याचे शक्यता आहे त्यानंतर पुन्हा वातावरण ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे शुक्रवारी तापमान ३९ अंश सेल्सिअल्सवर गेले होते गळा वातावरणात देखील उकडा कायम होता तर दुसरीकडे वाऱ्याचा वेग ताशी २५ किलोमीटर गेला होता दुपारच्या वेळी पावसाला सुरुवात झाली तेव्हा काही ठिकाणी वादळामध्ये वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५१ किलोमीटर पर्यंत गेला होता. वादळामुळे अनेक ठिकाणी घरांवरील पत्र उडून गेली