जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या कधीपासून?

---Advertisement---

 

जळगाव : गेल्या काही दिवसांत जोरदार बॅटिंग केल्यानंतर पावसाने ब्रेक घेतला आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांनंतर पुन्हा वीज आणि ढगांच्या गडगडाटांसह दमदार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.

जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ परंतु कोरडे हवामान आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतशिवारात पाणी साचले असून जिल्हा परिसरात नदी नाले प्रवाहीत झाले आहेत. बहुतांश ठिकाणी लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आले असून मध्यम प्रकल्पांचे आठ ते दहा दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग केला जात आहे.

दरम्यान दहा दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान दमदार पावसाने सर्वत्र गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात काही ठिकाणी अधूनमधून दमदार सरी कोसळल्या, काही ठिकाणी पावसामुळे भक्तांच्या उत्साहात खोळंबा घातला. अगदी विसर्जनाच्या दिवशी सुद्धा पाऊस कोसळतो की काय असे वाटत असतांनाच विसर्जनाच्या दिवशी देखील पावसाने भक्तांच्या उत्साहावर विरजण घातले नाही. मात्र, पाऊस पुन्हा एकदा तेवढ्याच जोमाने परतण्याची चिन्हे आहेत.

सद्यस्थितीत तापमान २९ ते ३० अंशादरम्यान असून हवेतील आर्द्रता ७५ ते ८० टक्केदरम्यान आहे. आगामी तीन चार ढगाळ तर काही अंशी निरभ्र राहण्याचे संकेत असून गुरूवारनंतर राज्यासह जळगाव जिल्ह्यात पुन्हा पावसाच्या दमदार आगमनाचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत.

जिल्ह्यात काही परिसरात अनंत चतुर्दशीदरम्यान पावसाने विश्रांती घेतली. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या. दरम्यान आता भारतीय हवामान खात्याने गणपती विसर्जनाच्या सोहळ्यानंतर पुढील चार पाच दिवसात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---