इंडिया आघाडी आणि भाजप हे पहिल्यांदाच चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यामध्ये भाजपनं विजय मिळवला आहे. भाजपचे मनोज सोनकर महापौर होणार आहेत. त्यांनी आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांचा पराभव केला.
भाजपला 16 तर इंडिया आघाडीला 12 मते मिळाली. 8 मते रद्द झाली आहेत. रद्द झालेली मते काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची होती. इंडिया आघाडीचे संख्याबळ 20 होते, त्यांना फक्त 12 मते मिळाली आणि 8 मते रद्द झाली.
दरम्यान , मतमोजणीदरम्यान पीठासीन अधिकाऱ्याने एजंटला पुढे येऊ दिले नाही आणि यादरम्यान त्यांनी पेनने काही खुणा केल्या, त्यानंतर मते रद्द करण्यात आली, असा आरोप आम आदमी पक्ष आणि काँग्रेस करत आहेत.