Chandrakant Baviskar : लिलाव पद्धतीने शेती; शेतकी संघाच्या नफ्यात वाढ

जामनेर : जामनेर तालुका शेतकरी सहकारी संघाची शेत जमीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी लिलाव पद्धतीने दिली जात आहे. यामुळे शेतकी संघाच्या नफ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याची माहिती शेतकरी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जामनेर तालुका शेतकरी संघाच्या मालकीची गारखेडा जवळील गंगापूर येथे धरणाच्या बॅकवॉटरला लागून १२ हेक्टर ५७ आर. शेतजमीन असून ही शेतजमीन शेतकऱ्याला कसण्यासाठी लिलाव पद्धतीने दिली जात आहे. मंगळवार, २८ रोजी लिलावासाठी शेतकऱ्यांना बोलाविण्यात आले होते. या लिलावामध्ये विनोद तुकाराम चौधरी यांनी सर्वाधिक ६ लाख ११ हजार रुपये बोली बोलल्याने त्यांना जमीन दोन वर्ष कसण्यासाठी देण्यात आली. या लिलावात सुभाष पवार, योगेश कचरे यांनीही भाग घेतला होता. संबंधित बोली घेतलेल्या शेतकऱ्याला जीएचटी सह ७ लाख २०हजार ९८० रुपये आता भरावे लागणार आहे.

शेतकी संघाच्या याच जमिनीचे गेल्या दहा वर्षांपूर्वी संबंधित शेतकरी फक्त ३०/३५ हजार रुपये देत होता. परंतु ना. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत बाविस्कर यांनी दहा वर्षापासून शेतकरी संघाच्या सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेला शेतकरी संघ नफ्यामध्ये आणून आज लाखो रुपयांचे उत्पन्न संघाला व्यापारी सकुल तसेच शेतीच्या माध्यमातून मिळत आहे .शेतकऱ्यांसाठी विविध योजनाही सभापती बाविस्कर यांनी सुरू केल्या
असून खऱ्या अर्थाने शेतकरी संघ शेतकऱ्यांसाठी काम करीत आहे.

या लिलावाच्या वेळी उपसभापती उत्तम राठोड, संचालक- डॉ. सुरेश मन्साराम पाटील ,बाबुराव गवळी, दगडू हरी पाटील, रंगनाथ पाटील ,साहेबराव देशमुख ,नाना पाटील, आबाजी पाटील, किशोर पवार, युवराज शेळके, भिकाजी जाधव ,रमेश नाईक, राजेंद्र पाटील, विजय पाटील ,संजय पाटील, बापू काळबैले, गिरीश पाटील आदी संचालक व व्यवस्थापक गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.