मुक्ताईनगर । मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार चंद्रकांत पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना शिवसेनेने (शिंदे गट) उमेदवारी दिली आहे. २०१९ साली मुक्ताईनगरातून चंद्रकांत पाटील निवडून आले होते. तर रोहिणी खडसे यांचा ३,३३१ मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अटीतटीची होईल, असे मानले जात आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर माध्यमाशी बोलल्या ‘गेल्या पाच वर्षांमध्ये केलेले विकास कामे आणि जनतेचे प्रेम यावर मी भरघोस मताधिक्याने निवडून येईल’, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. माझ्या विरोधकांना अजूनपर्यंत एबी फॉर्म मिळाला नाही, असेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचे नाव घेता सांगितले.
मुक्ताईनगर निवडणूक निकाल 2019
उमेदवाराचे नाव | मतं | निकाल |
---|---|---|
चंद्रकांत निंबा पाटील | 90,698 | IND WON |
खडसे रोहिणी एकनाथराव | 88,367 | BJP LOST |
राहुल अशोक पाटील | 9,715 | VBA LOST |
NOTA | 1,805 | NOTA LOST |
भगवान दामू इंगळे | 1,583 | BSP LOST |
संजू कडू इंगळे | 1,401 | BMUP LOST |
ज्योती महेंद्र पाटील | 888 | IND LOST |
संजय प्रल्हाद कांडेलकर | 560 | IND LOST |