Chandrasekhar Bawankule : वडेट्टीवार राहुल गांधींबाबत खरे बोलले; काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?

महाराष्ट्र : कॉंग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्त्व राहुल गांधी यांच्याबद्दल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जो वक्ता नाही तो नेता कसा बनू शकेल असे जाहीर विधान केले. ते खरे बोलले आहेत, जर वडेट्टीवार यांना अशी शंका असेल तर त्यांच्या मनात काय सुरू आहे, याचा अर्थ काढावा, असा चिमटा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला. २८ पक्षांच्या इंडी आघाडीच्या सर्व नेत्यांनी राहुल गांधी यांना नेतृत्त्व द्यावे किंवा नाही, याचा विचार करावा.

नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले की, या देशाच्या अनेक मान्यवर व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर, सर्वोत्तम भारताचा संकल्पाला पुढे नेण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार देशहिताच्या विचाराने भाजपा सोबत आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत, यातच भारताचे व राष्ट्राचे कल्याण आहे, असे सर्वांचे मत झाले आहे. पक्ष आणि चिन्ह हा वाद यात नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वादावार बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीत लोकांमधून विजयी झालेले आमदार-खासदार ज्याबाजूने असेल त्यांचा तो पक्ष असेल, असे माझे मत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय अखेर निवडणूक आयोगाला घ्यायाचा आहे, असेही ते म्हणाले.

कोराडीच्या श्री जगदंबा देवस्थानात यंदा २५ लाख भाविक दर्शन घेणार आहेत. रामायण सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले असून ते आता पर्यटकांना पाहता येईल. आजवरच्या,७०० वर्षांच्या इतिहासात अष्टमीच्या दिवशी प्रथमच ५००० महिला देवी महालक्ष्मी जगदंबेची आरती करणार आहे. मागील काही दिवसात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्र व देशाचे रक्षण करण्यासाठी ९ दिवस अविरत यज्ञ सुरू राहणार आहे. यासोबतच ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानातंर्गत जिल्हाभरातील १० हजार अमृत कलश कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात एकत्र आणले जातील असेही त्यांनी सांगितले.