बावनकुळेंनी दिली तांबेंना खुली ऑफर, भाजपमध्ये आले तर..

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात यंदा नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. म्हणजे, राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान पार पडले. पाच जागांपैकी सर्वत्र चर्चा होती ती नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांबाबत. दरम्यान, आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केले असून त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले आहे.

बावनकुळे यांनी काय विधान केलंय?
“सत्यजीत तांबे भाजपमध्ये आले तर स्वागत आहे. आमची त्यांना भाजपमध्ये घेण्याची पूर्ण तयारी आहे. सत्यजीत तांबे यांनी निर्णय घ्यावा, ते पक्षात आले तर त्यांचे स्वागत आहे. पक्षात अनेक लोक आले आहे सत्यजीत तांबे आले किंवा इतर कुणी आले तर त्यांचे आम्ही स्वागत करु”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

पदवीधर शिक्षक मतदानाच्या निकालात भाजप आणि युतीला जास्त यश मिळणार आहे. चार जागा आम्ही लढवल्या होत्या, नागपूरच्या जागेवर आम्ही समर्थन दिलं होतं आणि सत्यजित तांबे यांना स्थानिक भाजपने समर्थन दिलं आहे. त्यामुळे निकाल चांगले येणार असल्याचे त्यांनी बावनकुळे आहे.

जर सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर स्वागत आहे आमची त्यांना भाजपात घेण्याची तयारी आहे. सत्यजित तांबे यांनी निर्णय घ्यावा, ते आले तर आम्ही कधीही तयार आहोत. पक्षात अनेक लोक आले आहेत. सत्यजित तांबे आले किंवा इतर कुणी आले. पक्षात यायला अडचण नाही. तर सत्यजित तांबे आले तर आम्ही स्वागत करु, असे म्हणत बावनकुळेंनी तांबेंना खुली ऑफर दिली आहे.