तरुण भारत लाईव्ह । ०१ फेब्रुवारी २०२३। आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च स्टार्टअप ओपन एआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एआय चॅटबॉट चॅटजीपीटी लाँच केले. चॅटजीपीटी हे कोणत्याही विषयावर संपूर्ण मजकूर तयार करू शकते. पण आता कंपनी त्याच्यासाठी शुल्क आकरणार आहे. नेमकं किती पैसे मोजावे लागतील हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
चॅटजीपीटी हे सतत चर्चेत आहेत चॅटजीपीटी हे कोणत्याही विषयावर संपूर्ण मजकूर तयार करू शकते चॅटजीपीटीचा वापर करून कविता आणि कथा लिहिता येतात. एका आठवड्यापूर्वी, कंपनीने ओपन-टू-ऑल चॅटबॉटवर कमाई करण्याबद्दल सांगितले होते. आता कंपनीने प्रीमियम व्हर्जनही आणण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने याला चॅटजीपीटी प्रोफेशनल असे नाव दिले आहे. लोकप्रिय AI चॅटबॉटचे पेड व्हर्जन दरमहा $42 मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. चॅटजीपीटीच्या प्रीमियम आवृत्तीसह युजर्सना अतिरिक्त वैशिष्ट्ये मिळतील. युजर्सना सुधारित उपलब्धता मिळेल.
आता चॅटजीपीटी प्रोफेशनल सामान्य लोकांसाठी प्रवेशयोग्य असणार नाही. सध्या ही प्रीमियम वैशिष्ट्ये निवडक युजर्ससाठी उपलब्ध करून दिली जात आहेत.