लासूर ता.चोपडा : चोपडा तालूका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने रेशन दूकानदारांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्तभाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांची पूर्तता करुन धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणींची सोडवणूक करण्याबाबत २७ रोजी निवेदन देण्यात आले. यात स्वस्त धान्य दुकानदार यांना आजचा महागाई निर्देशांकानुसार किमान १०० रूपये प्रति क्विंटल वाढ करावी, धान्याचा गोणी कमी भरत असून ते वजन पुर्ण ५० किलो मिळावे,प्रत्येक लाभार्थ्यांची ई के वाय सी व मोबाईल सिडींग करण्यासाठी वेळेचे बंधन नसावे व ही प्रक्रिया निरंतर सुरू ठेवावी व हे सिडींगचे प्रती सदस्य ५० रुपये शुल्क लाभार्थ्यांकडून वसूल करणेसाठी परवानगी मिळावी, रास्त भाव दूकानदारांना प्रलंबित मार्जिन मिळावे व यापुढे दर महिन्याला पाच तारखेपर्यंत नियमित मिळावे अशा विविध मागण्या करण्यात दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या.
या निवेदनावर चोपडा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या सह सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या सह्या आहेत.यावेळी मधूकर राजपूत , दिलीप पालीवाल,ए.डी.कोळी, कांतीलाल चौधरी,संजय पाटील प्रविण पाटील,रुपेश कोष्टी ,राजू तडवी, सरफराज तडवी योगेश बाविस्कर तसेच महिला बचत गटाच्या सौ.मिनाबाई कोळी,सौ.मायाबाई महाजन यांच्या सह स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.