झटपट चीझ ओनियन रिंग रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । १० एप्रिल २०२३। संध्याकाळच्या वेळेला भूक लागते. अशावेळी काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. तर यावेळी तुम्ही चीझ ओनियन रिंग घरी ट्राय करू शकता. झटपट होणारा, वेळेची बचत करणारा तसेच पार्टीच्या मूडप्रमाणे सर्वांना मनसोक्त चाखता येणारा पदार्थ आहे. चीझ ओनियन रिंग घरी कस बनवतात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
गोलाकार चिरलेला कांदा, चीज स्लाइस, मैदा, कॉर्नफिल्क्स, बेडक्रम्स, कॉर्नफ्लॉवर, हर्ब्स, कोथिंबिर, तेल

कृती 
सर्वप्रथम, कांदा गोलाकार चिरून घ्यावा. कांद्याच्या सर्व चकत्या स्वतंत्र कराव्यात. चीजचे पातळ उभे काप करावेत. कांद्याच्या गोलाकार जागेत चीजस्लाइस भराव्यात. चीजच्या बाहेरील बाजूस पुन्हा कांद्याची चकती रचून ठेवावी. एका बाऊलमध्ये दोन चमचे मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यावा, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, तिखट आणि हर्ब्स घालावे. त्यामध्ये गरजेप्रमाणे थोडेथोडे थंड पाणी घालून मिश्रण तयार करावे. मिश्रणात कोंथिबीर घालावी. दुसऱ्या ताटात बेडक्रम्स, कॉर्नफ्लेक्सचा चुरा, हर्ब्स, मीठ आणि कोशिंबीर घालावी. एक रिंग घेऊन मैद्याच्या मिश्रणात घोळवावी. नंतर तिच रिंग ब्रेडक्रम्समध्ये घोळवावी. पुन्हा मैद्याचे मिश्रण आणि ब्रेडक्रम्समध्ये घोळवून सर्व रिंग्स तयार करून घ्याव्यात. रिंग्स तयार झाल्यानंतर फ्रिजमध्ये सुमारे अर्धातास ठेवावी. त्यानंतर त्या रिंग्स तेलात तळाव्यात.