तरुण भारत लाईव्ह ।१९ फेब्रुवारी २०२३। पावाचे बरेच पदार्थ आपण खाल्ले आहेत. सॅडवहीच, पिझ्झा, बर्गर हे सगळे पदार्थ पावपासून बनवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का? पावापासून बनणारा गार्लिक ब्रेड हा पदार्थ सुद्धा तुम्ही घरी बनवू शकतात. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
ब्रेडचे स्लाइस, बटर, लसणाऱ्या पाकळ्या, चिली फ्लेक्स, मिरी पूड, कोथिंबीर, किसलेलं चीज
कृती
सर्वप्रथम ब्रेड स्लाइसला एका बाजूने बटर लावा नंतर एका भांड्यात बटर, लसूण, चिली फ्लेक्स, मिरी पूड आणि कोथिंबीर एकत्र करून चमच्यानं फेटून घ्या. आता हे तयार गार्लिक बटर ब्रेडच्या दुसऱ्या बाजूला लावा. आता प्रत्येक स्लाइजवर चीज पसरवून स्लाइजेस ओव्हन पॅनवर ठेवून सहा ते सात मिनिटं बेक करा. आणि सर्व्ह करा गार्लिक ब्रेड