मुंबई । शेतकऱ्यांना आर्थिक झटका देणारी एक बातमी आहे. जागतिक बाजारात कच्च्या मालाचे दर वाढल्याचा दावा करीत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरात प्रतिबॅग (५० किलो) २०० ते २५५ रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ १ जानेवारीपासून लागू होणार असल्याचे संकेत कंपन्यांनी दिले असले.
डीएपी, टीएसपी आणि १०:२६:२६ तसेच १२:३२:१६ या खतांच्या किमतीत वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान रासायनिक खतांच्या किमतीतील वाढ शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी आहे. शेतीच्या उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ होत आहे. यात रासायनिक खतांची भूमिका आणखी महत्वाची असते. दरम्यान, सततच्या दरवाढीला विरोध करत सरकारकडून या वाढीव दरांचे पुनरावलोकन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
असे असणार नवीन दर?
खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत. वाढीव दरानुसार डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खताची किंमत प्रतिपिशवी १ हजार ३५० रुपयांवरून १ हजार ५९० रुपयांवर गेली आहे. टीएसपी ४६ टक्के (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खताची किंमत १३०० ऐवजी १३५०, तर १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमती १४७० रुपयांवरून १७२५ रुपये होणार आहे.