हिरव्यागार भाज्या की विष?

– संजय रामगिरवार

Chemicals in vegetables बाजारात हिरवीगार लुसलुशीत भाजी दिसली की आपण सुखावतो. लगेच खरेदी करण्याचा मोह होतो आणि आपण ती घेतोही. पण पुढील वेळी अशी भाजी खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागेल, अशी गंभीर स्थिती सध्या उद्भवली आहे. माध्यमांमध्ये मध्यंतरी औद्योगिक व नागरी वसाहतीतील सांडपाण्याविषयी बातमी प्रकाशित झाली होती. मात्र, याकडे नागरिकांचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. Chemicals in vegetables काही महिन्यांपूर्वी राज्यातील दोन-तीन प्रदूषित नद्यांच्या काठांवर पिकविण्यात आलेल्या भाज्यांचे नमुने गोळा करण्यात आले तसेच या नद्यांच्या पाण्याचे नमुने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तपासण्यासाठी दिले. याचे आलेले अहवाल धक्कादायक आहेत. Chemicals in vegetables या नद्यांमध्ये औद्योगिक व नागरी वसाहतीतील सांडपाणी मिसळत असल्याने हे पाणी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. या पाण्यात जड धातूंसोबतच मानवी विष्ठा मिसळते. जड धातू व मानवी विष्ठेतील विषाणू या भाज्यांमध्ये जातात. याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

Chemicals in vegetables या भाज्यांमध्ये लेड (शिसे), मर्क्युरी (पारा), झिंक (जस्त), कॉपर (तांबे) आणि कोबाल्ट यासारख्या जड धातूंचा अंतर्भाव झाल्याने आपल्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या भाज्या खाल्ल्याने तत्काळ परिणाम दिसत नसला, तरी भविष्यात यामुळे किडनी, यकृताचे विकार, अर्धांगवायू, लिव्हर सोरायसीस यासारख्या गंभीर आणि प्राणघातक आजारांना सामोरे जावे लागू शकते. मध्यंतरी जोधपूर विद्यापीठातील कृषी विभागाने दूषित पाण्यावर शेतीचा अभ्यास केला आहे. यातील निष्कर्षांनुसार तीन फूट उंचीपर्यंत उगवणा-या भाज्यांकरिता जड धातू असणारे दूषित पाणी वापरणे धोकादायक आहे. Chemicals in vegetables याचा अर्थ सर्व पालेभाज्या तसेच कोबी, वांगी यासारख्या भाज्यांसाठी या पाण्याचा होणारा वापर आरोग्यासाठी घातक आहे. अर्थात हा निष्कर्ष देशभरात सर्वत्र लागू होतो. औद्योगिक व नागरी वसाहतीतील सांडपाण्यामुळे कृषी उत्पन्नावर गंभीर परिणाम होत असतानाच दुसरीकडे रासायनिक खतांचा वापर करून पिकविण्यात येणारे अन्नधान्य, भाज्या, फळे याचे भयंकर दुष्परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. Chemicals in vegetables म्हणजे रासायनिक भाज्या, फळे किंवा कृषिमाल यावर दुहेरी संकट कोसळले आहे.

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की, त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक राहात नाहीत. त्यामुळेच भारतातून युरोप खंडात पाठविल्या जाणा-या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि कसलीही जंतुनाशके न मारता निव्वळ सेंद्रिय शेती केली असेल तर त्या शेतातलाच माल कटाक्षाने विकत घेतला जातो; याउपरही खतांचा आणि औषधांचा वापर केलाच असेल तर त्या खतांचे आणि औषधांचे काही अंश फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये उतरलेले तर नाहीत ना, याची खातरजमा केली जाते. Chemicals in vegetables तसे ते उतरले नसतील तरच तो माल घेतला जातो. अन्यथा तो परत पाठवला जातो. याबाबत ही दक्षता घेण्याचे कारण असे की, खताचे अंंश उतरलेले खाद्य पदार्थ खाल्ले तर ते खताचे रासायनिक अंश आणि औषधातील विषारी अंश आपल्या खाण्यातून रक्तात पोहोचत असतात. याबाबत पंजाबमध्ये काही विदारक अनुभव आले आहेत.

पंजाबमध्ये सर्वत्र समृद्धी असल्यामुळे आणि बहुतांश शेतजमीन बागायती असल्यामुळे सगळे शेतकरी सधन आहेत आणि ते आपापल्या शेतात राबत असतात. Chemicals in vegetables त्यामुळे दुस-याच्या शेतात कामाला जाणारे मजूर तेथे फारसे आढळतच नाहीत. मग त्यासाठी बिहारमधले मजूर पंजाबमध्ये कामाला जातात. तेही मिळाले नाहीत तर पिकांमध्ये आलेले तण काढणार कोण, असा प्रश्न निर्माण होतो. तशी स्थिती आल्यास विषारी तणनाशकांचा मारा करून तण नाहीसे केले जाते. या विषारी तणनाशकाचे अंश गव्हामध्ये किंवा तांदळामध्ये उतरलेले असतात. तो गहू खाणा-याच्या रक्तातसुद्धा ते उतरतात. पंजाबमध्ये काही तरुणांच्या रक्ताचे नमुने तपासले असता त्यांच्या रक्तात या तणनाशकाचे अंश सापडले आहेत. Chemicals in vegetables आपण आपले रक्त या दृष्टीने तपासत नाही म्हणून ठीक आहे. परंतु आपण तसे ते तपासायला लागलो तर त्या तपासणीचे निष्कर्ष धक्कादायक ठरणार आहेत.

या विषयुक्त पिकांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष काही संशोधकांनी काढला आहे. रासायनिक खतांचे आणि जंतुनाशकांचे परिणाम एवढे गंभीर असतील तर आपण त्याच खतांचा आणि जंतुनाशकांचा वापर करण्याचा अट्टाहास का करीत आहोत, हा प्रश्न पडतो. ज्या लोकांना या परिणामांची जाणीव झाली आहे ते लोक मात्र सावध झाले आहेत आणि शक्यतो सेंद्रिय शेतीत तयार झालेला माल वापरला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. सेंद्रिय शेतमाल थोडा महाग मिळाला तरी हरकत नाही, परंतु तोच ग्रहण केला पाहिजे, असा आग्रह धरणारे लोक आता दिसायला लागले आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीतील मालाला यापुढच्या काळात चांगली मागणी राहणार आहे. सेंद्रिय शेतीच अधिक उपयुक्त ठरणार आहे. सेंद्रिय शेतीचा अतिरेकी आग्रहदेखील प्रचंड अडचणीचा ठरून लोकांना उपाशी राहावे लागू शकते. शेजारच्या श्रीलंकेचे उदाहरण पुरेसे बोलके ठरावे. त्यामुळे आरोग्य व उत्पादन यांची सांगड घालूनच संतुलित असे कृषी धोरण राबविणे, ही काळाची गरज आहे.

९८८१७१७८३२