---Advertisement---
Cheteshwar Pujara Retirement: क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. चेतेश्वर पुजाराने याने सोशल मीडियावर पोस्ट करीत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केले आहे. त्याने आपल्या भावुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय जर्सी घालणे, राष्ट्रगीत गाणे आणि मैदानावर पाऊल ठेवताना प्रत्येक वेळी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणे, या गोष्टी शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. पण जसे आपण म्हणतो प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट होतो. मी अपार कृतज्ञतेने सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
पुजाराने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी बीसीसीआय आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आभार मानू इच्छितो. गेल्या काही वर्षांत मी ज्या संघांचे, फ्रँचायझींचे आणि काउंटी संघांचे प्रतिनिधित्व केले आहे त्यांचे मी आभारी आहे. माझ्या प्रशिक्षकांच्या आणि आध्यात्मिक गुरूंच्या अमूल्य मार्गदर्शनाशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो, मी नेहमीच त्यांचा ऋणी राहीन.
पुजाराने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, राजकोट सारख्या छोट्या शहरातील एका लहान मुलाप्रमाणे, माझ्या पालकांसह, मी आकाशाला गवसणी घालण्याचे लक्ष्य ठेवले होते. यात भारतीय क्रिकेट संघाचा भाग होण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पहाताना मला कल्पनाही नव्हती की हा खेळ मला सर्व प्रकारची अनुभूती देईल. क्रिकेटने मला अमूल्य संधी, अनुभव, उद्देश, प्रेम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या राज्याचे आणि या महान राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे.