Chhagan Bhujbal : वेगळा निर्णय का घेतला?; भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर नाव न घेता टीका केली. तसेच वेगळा निर्णय का घेतला? याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली.

काय म्हणाले भुजबळ?
कायदे आम्हालाही कळतात. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काही कसे करू? आम्ही पूर्ण विचार करूनच निर्णय घेतला. सकाळी उठलो आणि निर्णय घेतला आहे असं झालं नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसेच 2014ला स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला? अजित पवार यांनी पहाटे शपथविधी का घेतला? त्याच्यामागे कोण होतं? असा सवाल करत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.

वांद्रे येथील एमईटी मैदानावर अजित पवार गटाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात छगन भुजबळ बोलत आहेत. यावेळी भुजबळ यांनी काही प्रश्न उपस्थित करत आपल्याच नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. शॉर्ट नोटीसवर सात आठ हजार लोक उपस्थित आहे. 40 हून अधिक आमदारांचं आम्हाला समर्थन आहे.

काही आमदार वाटेत आहेत. नव्या दमाने राष्ट्रवादी पक्ष मजबुतीने वाटचाल करणार आहे. काल काही नियुक्त्या झाल्या. परवा काही नियुक्त्या झाल्या. येत्या काही दिवसात अनेक नियुक्त्या होतील, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.