Maratha Reservation : आज दोन सभा; तोफ कुणावर धडाडणार?

ठाणे : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नयेत यासाठी भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांच्याकडून राज्यभरात ओबीसी सभा देखील घेतल्या जात आहे. दरम्यान,  आज रविवारी ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव येथे ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सभेत छगन भुजबळ नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज, रविवारी आंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. दरम्यान, काही तासांत या बैठकीला सुरवात होणार असून, त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढणार नाही, तसेच ओबीसी यांचे आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे.” त्यामुळे ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याची भूमिका घेणारे जरांगे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्याकडून सतत भुजबळ यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे आजच्या सभेतून भुजबळ जरांगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.