---Advertisement---

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

---Advertisement---

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहेत. त्यातच राज्याच्या राजकारणातून एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ हे शरद पवारांची भेट घेणार आहे. शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर ही भेट होणार आहे. या भेटीसाठी छगन भुजबळ हे सिल्व्हर ओक बंगल्यावर दाखल झाले आहेत.

दरम्यान, काल बारामतीच्या सभेतून छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर मोठा आरोप केला होता. त्यानंतर आज थेट ते शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment