Jalgaon News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयावर भुजबळांचे बॅनर झळकले, चर्चांना उधाण

---Advertisement---

 

जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत छगन भुजबळ आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयावर छगन भुजबळांचे बॅनर झळकले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

समता परिषदेच्या वतीने छगन भुजबळ यांचे स्वागत बॅनर चक्क शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यालयावर लावण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 अजित पवार यांचेही ‘मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर झळकले

जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर ”दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी विठोबा चरणी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना” अशा ठळक आशयाचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर झळकले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

निवडणुकीचा बिगुल फुंकणार ?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणे अपेक्षित असून, त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आघाडी घेत जळगावात बिगुल फुंकण्याची तयारी केली आहे. शनिवारी रात्री त्यांचे जळगाव विमानतळावर आगमण झाले होते. त्यांच्या उपस्थितीत आज मेळावा होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---