---Advertisement---
लखनौ : छांगुर बाबा आणि त्याचे साथीदार पद्धतशीरपणे आणि नियोजनबद्धरित्या काम करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे. हिंदू मुली आणि मुलांचे धर्मपरिवर्तन करून देशात मुस्लिमांची लोकसंख्या वाढवायची आणि २०४७ पर्यंत भारताला मुस्लिम देश बनविण्याचा कट छांगुर बाबा आणि टोळीने आखल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या धर्माध छांगुरने ज्या युवतींचे धर्मांतर केले, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचे कारनामे जगासमोर आणले आहे.
छांगूर बाबाने माझे धर्मांतर केले. त्याच्या साथीदारांनी सहारनपूर, बलरामपूर आणि कर्नाटकमध्ये माझ्यावर अनेक वेळा सामूहिक अत्याचार केला. मी सहारनपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, परंतु छांगूरच्या दबावाखाली पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा गौप्यस्फोट पीडितेने पत्रकार परिषदेत केला. लखनौ येथील विश्व हिंदू रक्षा परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत छांगूरच्या बळी ठरलेल्या मुलींनी आपली व्यथा मांडली.
औरैया येथील एका तरुणीने सांगितले की, माझ्या वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे माझी आई त्रासली होती. माझी आई अनुराग शर्मा यांना भेटली. त्याने मला सांगितले की, छांगूर बाबा त्यांना दारू पिण्याच्या सवयीपासून मुक्त होण्यास मदत करतील. माझी आई त्यांच्या जाळ्यात अडकली. जेव्हा छांगूर बाबा कानपूरला आले तेव्हा मी त्यांना माझ्या कुटुंबासह भेटलो. त्यानंतर अनुरागने माझ्याशी फतेहपूर मशिदीत लग्न केले. नंतर मला कळले की तो हिंदू नाही, तर मुस्लिम आहे. त्याचे नाव मेराज अन्सारी आहे. या काळात छांगूर माझ्याशी व्हिडीओ कॉलवर बोलला आणि माझे नाव साबा ठेवले. लग्नानंतर अनुरागने मला तीन महिने त्याच्या घरात कैद केले.
छांगुरचे सौदीत ५०० पेक्षा जास्त एजंट
हिंदू मुलींना पाकिस्तान आणि मुस्लिम देशांमध्ये पाठवले जात होते. सपा नेता छांगूरसोबत धर्मांतराच्या व्यवसायातही सहभागी आहे. बलरामपूरनंतर, छांगूर फरिदाबाद आणि हरयाणामध्ये धर्मांतराचे जाळे पसरवत होता. छांगूर बाबाचे सौदी अरेबियात ५०० हून अधिक एजंट आहेत.