महाविद्यालयीन निवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले संकेत, होणार ‘रणसंग्राम’?

#image_title

College Elections : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे महाविद्यालयीन छात्रसंघ निवडणुकीचे वारे पुन्हा एकदा वाहू लागले आहेत. 30 वर्षांपासून बंद असलेल्या या निवडणुकांचे भविष्य आता अनिश्चित असले तरी विद्यार्थी वर्गाच्या चर्चेला वेग आला आहे.

1994 पासून बंद निवडणुकांचा गुलाल पुन्हा उधळणार का?

1994 मध्ये महाविद्यालयातील निवडणुका बंद करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य शासनाने घेतला होता. यामागे भांडण, तंटे आणि गुन्हेगारी वर्तनाचा वाढता त्रास होता. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधीची निवड गुणवत्ता आधारित पद्धतीने सुरू करण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित निवड होऊ लागली. परंतु या पद्धतीमुळे चांगले नेतृत्व मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहेत.

हेही वाचा : हृदयद्रावक ! रेल्वे रुळ ओलांडण विद्यार्थिनीला पडलं महागात; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ व्हायरल

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक विचार दर्शवला असून, महाविद्यालयीन निवडणुका खुल्या पद्धतीने घेण्याचे संकेत दिले आहेत.

भाजप आणि काँग्रेसनेदेखील या निवडणुका खुल्या पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे. भाजप विचारधारेशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि काँग्रेसच्या एनएसयुआयने महाविद्यालयीन निवडणुका सिलेक्शन पद्धतीऐवजी इलेक्शन पद्धतीने घेण्याचे आवाहन केले आहे.

दिसामाजी राजकारणातून कार्यकर्ते आणि नेत्यांचे पिढी तयार होणारी महाविद्यालयीन निवडणुका, राज्य आणि देशातील सध्याच्या सर्वपक्षीय नेतृत्वाचे ‘ट्रेनिंग ग्राऊंड’ ठरली आहे. या निवडणुकांमुळे विद्यार्थी संघटनांचे अस्तित्व आणि विद्यार्थ्यांचे हित जपणारी आंदोलनं देखील साकार होतात.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाची मुळं महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये आहेत. या निवडणुका सुरू होण्यामुळे विद्यार्थी वर्गाला आपले नेतृत्व शोधता येईल. त्याचबरोबर, कॉलेज कॅम्पस आणि विद्यार्थ्यांमधून राजकीय कार्यकर्त्यांची वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या कॅम्पसमध्ये वाढत असलेल्या अराजकतावादी आणि माओवादी विचारांचा उल्लेख केला आणि यासाठी योग्य नेतृत्व तयार करण्याची गरज अधोरेखित केली. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले हे संकेत खरे ठरतात का ? हे पाहावं लागणार आहे.