---Advertisement---
मुंबई : उध्दवजी आता २०२९ पर्यंत आम्हाला तिकडे विरोधी बाकावर यायचा स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भर सभागृहात उध्दव ठाकरेंना खुली ऑफर दिली. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानं नव्या राजकीय चर्चाना उधान आले असून, आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवेंच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ २९ ऑगस्टला पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. उध्दवजी, अंबादास दानवे हे आज तुमच्यासोबत असले तरी, मुळात त्यांच्या राजकीय जिवनाची सुरुवात ही भाजपातून झालेली आहे. त्यांनी भाजपायुवा मोर्चामध्ये काम केलं आहे. त्यांचं संपूर्ण राजकीय जिवन भाजपामध्येच घडलं. मधल्याकाळात आमच्या पक्षात काही मतभेद झाले आणि त्यातून दानवेंना पक्षाने सोडलं. पण भाजपच्या मुशीत तयार झाल्याने, त्यांच्यात चिकाटीपणा दिसतो, संघटनात्मक कौशल्य आणि अभ्यासू वृत्तीदेखील त्यांच्यात पहायला मिळते. एका एसटी ड्रायव्हरचा मुलगा एवढ्या मोठ्यापदावर येणं अभिमानास्पद आहे.
एका एसटी ड्रायव्हरचा मुलगा आपल्या कतृत्वानं एवढा मोठा झाला. हे खरोखर अभिमानास्पद बाब आहे. अंबादासजी कुठेही असले तरी त्यांचा मूळ आत्मा हा हिंदूत्वाचा आहे. विचार महत्वाचे आहेत. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी दानवेंसाठी गौरवागार काढले.
अंबादास दानवेंनी औरंगाबादच्या नामांतरणासाठी आंदोलन केली होती. सुदैवानं त्यांची मागणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही पूर्ण केली. असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढताच समोरुन उध्दव ठाकरेंनी आम्ही केल्याचा उल्लेख केला.
याला उशिरा आलेलं शहाणपणं म्हणतात
तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, ज्यावेळी राज्यपालांनी बहुमत सिध्द करण्याचे पत्र दिले. त्यानंतर अल्पमतातल्या सरकारणं मंत्रिमंडळाची बैठक बोलावणं हेच चुकीचं आहे. मुळात ती बैठकच अवैध होती. त्यामुळं त्या बैठकीतले निर्णय देखील अवैध असतात. तरीसुध्दा तुम्ही सरकार पडतानाच का होईना, अवैधच का होईना निर्णय घेतला, त्याला उशिरा आलेलं शहाणपणं असे म्हणतात, असा टोला उध्दव ठाकरेंना लगावला.