Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या धुळ्यात, ‘हे’ मंत्री राहणार उपस्थित

---Advertisement---

 

धुळे : माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने उद्या दि. २७ रोजी धुळ्यात अभिवादन आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावेळी राज्य मंत्री मंडळातील विविध खात्याचे मंत्री तसेच आजी-माजी आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत.

राजकारणात महाराष्ट्राच्या आपल्या प्रभावी कार्याने राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त धुळ्यात शनिवार दि. २७ रोजी दुपारी साडे बारा वाजता हा अभिवादन आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

गौरव ग्रंथाचे प्रकाशन


यावेळी रोहिदास पाटील यांच्या कार्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन ही करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन रोहिदास पाटील सामाजिक कृतज्ञता ट्रस्टचे अध्यक्ष विनय पाटील आणि माजी आमदार कुणाल पाटील यांनी केले आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---