CM Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून, दुपारी १.३० वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर मुक्ताईनगर येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्याकडे रवाना होणार आहे. दरम्यान, आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री हे कोणतीही घोषणा करू शकणार नाही मात्र, शिवसेनेने अद्याप (शिंदे गट) उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसून ही यादी आज मुक्ताईनगरमधून जाहीर करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
तसेच शिवसेना शिंदे गट आपले ‘जैसे थे’ उमेदवार ठेवून भाजपाच्या पावलावर पाऊल ठेवणार का वा यात काही बदल होणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुक्ताईनगरमध्ये तीन ते चारदा येऊन गेले आहेत. त्यामुळे मुक्ताईनगरात मुख्यमंत्री यांचे एक वेगळे रसायन तयार झालेले आहेत.
आचारसंहिता लागण्यापूर्वीदेखील मुख्यमंत्री हे मुक्ताईनगरमध्ये येणार होते मात्र तो कार्यक्रम रद्द झाला. आचारसंहिता लागल्यावर मुख्यमंत्री आज मुक्ताईनगरात येणार आहेत. मात्र आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री हे कोणतीही घोषणा करू शकणार नाही मात्र, शिवसेनेने अद्याप (शिंदे गट) उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसून ही यादी आज मुक्ताईनगरमधून जाहीर करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचे पाच विद्यमान आमदार आहेत. जळगाव ग्रामीणमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, एरंडोलमध्ये चिमणराव पाटील, पाचोरामध्ये किशोर आप्पा पाटील, मुक्ताईनगरमध्ये अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील तर चोपड्यामध्ये लता सोनवणे हे शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत.
यात एरंडोल येथील चिमणराव पाटील यांनी आपल्या मुलासाठी तिकीट मागण्याची चर्चा आहे तर चोपडा येथे विद्यमान आमदार लता सोनवणे यांच्या जातीच्या प्रमाणपत्रावरून अडचण आल्याने त्या सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात अडचण येऊ नये म्हणून त्यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना संधी मिळू शकते.