---Advertisement---

Maharashtra Politics : ‘ही राजकीय भेट…’, राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणणाऱ्या भेटीवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन घेतलेल्या भेटीबाबत बोलताना, ही केवळ मैत्रीपूर्ण भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांना राज ठाकरेंच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी उत्तर दिले, “ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की मी त्यांच्या घरी येईन, त्यानुसार मी आज त्यांच्या घरी गेलो.”

हेही वाचा : Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या काय आहे?

यावेळी त्यांनी ब्रेकफास्ट केल्याचे आणि काही वैयक्तिक चर्चा झाल्याचेही सांगितले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “या भेटीचा कुठलाही राजकीय संबंध नाही. फक्त मैत्री म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो.”

राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण

फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना जोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी पक्षाच्या मेळाव्यात भाजपाच्या सहयोगी पक्षाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ४१ जागा जिंकल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त करत, “लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, पण ती मतं आपल्यापर्यंत आली नाहीत,” असे विधान केले होते.

हेही वाचा : वीज बिल कमी करण्याच्या बदल्यात पत्नीची मागणी? शेतकऱ्याचा जेईवर गंभीर आरोप!

त्यामुळे राज ठाकरे भाजपाविरोधी भूमिका घेणार का, याबाबत चर्चा रंगली होती. मात्र, आजच्या भेटीनंतर फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील नातं मैत्रीपूर्ण असले तरी त्याचा राजकीय संदर्भ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भविष्यात भाजप-मनसे युतीचा मार्ग मोकळा?

या भेटीमुळे राजकीय समीकरणांबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असले तरी, भविष्यात मनसे आणि भाजप युती करणार का, हा मोठा प्रश्न आहे. युतीबाबत दोन्ही नेत्यांनी काहीही भाष्य केले नसले तरी, आगामी निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment