महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयावर विरोधकांकडून ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करण्यात आले आहे. खासकरून, संध्याकाळी 6 वाजेनंतर मतदान आकडेवारीतील अचानक वाढीवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात स्पष्ट प्रत्युत्तर दिलं.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, “सहा वाजेनंतरच्या मतदानाची आकडेवारी १७ लाख आहे. ५ ते ६ वाजेच्या मतदानाची गणना गृहित धरली नाही आणि अचानक ७५ लाख मतदान कसे आले, असा सवाल विचारला जात आहे. पण जनतेनेच आम्हाला निवडून दिलं आणि आम्ही जिंकून आलो,” असं ते म्हणाले.
मारकडवाडीच्या आरोपांवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “मारकडवाडीत कोणती पद्धत वापरली गेली हे प्रश्न निर्माण करतात. पवार कधीही ईव्हीएमवर बोलले नाहीत, पवारांनी बॅलन्स नेत्या पद्धतीने आपली भूमिका मांडली.”
याशिवाय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१२ नंतर व्हिव्हीपॅटच्या प्रणालीची महत्त्वपूर्ण भूमिका सांगितली, ज्यामुळे ईव्हीएमच्या निकालाची विश्वसनीयता पडताळली जाते. “व्हिव्हीपॅटचा वापर झाल्यानंतर, बॅलेट पेपरवरचं मतदान फॉर्मल पद्धतीने मोजलं जातं, आणि हे निकाल जाहीर होण्यापूर्वी तपासले जातात,” असे ते म्हणाले.
त्यांच्या या स्पष्ट आणि सडेतोड भाषणामुळे विरोधकांचे आरोप प्रत्युत्तरात धरण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकशाहीची आणि ईव्हीएम प्रणालीची महत्त्वपूर्ण बाजू मांडली.