मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय बँकर्स समिती’ची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अनेक बँकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी सिबिल स्कोअर मागणे थांबवा, अन्यथा कारवाई होईल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासगी बँकांना दिला आहे.
शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल मागू नका, हे आम्ही वारंवार सांगतो आहोत. पण अजूनही काही बँका त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आम्ही काही खासगी बँकांवर एफआयआर दाखल केले आहेत. हे बँकांनी गांभीर्याने घ्यावे, सिबिलसंदर्भात रिझर्व्ह बँकेने सुद्धा बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत, जर कोणती बँक शाखा सिबिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला म्हणाले. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी ही बँकांचीही जबाबदारी आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांना सन्मानित करा, आणि जे दुर्लक्ष करतील, त्यांची नावं पुढच्या बैठकीत सादर करा,” असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.
या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी अॅक्सीस बँक आयसीआयसीआय, आणि एचडीएफसी बँकांना बँकांना चांगलंच झापलं आहे. राज्यात यंदा पावसाचे संकेत चांगले असून, दुष्काळाची शक्यता कमी आहे. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना बँकांनी भरघोस सहकार्य करायला हवे. शेतकरी उत्पादक कंपन्या मोठ्या संख्येने कार्यरत असून त्यांना बळकट करणे आवश्यक आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले.