मुंबई : सत्तेत येताच काय केलं, याची संपूर्ण यादीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत वाचली. सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यात अंधारी आल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला. आमचं सरकार सकारात्मक निर्णय घेतं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सुरू केला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा नागरिकांना लाभ होत आहे. मुंबईत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ प्रकल्पाचा शुभारंभ केला. आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी मेट्रो प्रवासाचा फायदा घेतला, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर असल्याचंही त्यांनी सांगितलं.
विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी
अभिभाषणावर बोलाल अशी अपेक्षा होती. विरोधकांनी विरोधकासारखं बोललं पाहिजे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे. आम्ही जे काम करतो ते तुम्हाला दिसत नाही, असा हल्लाबोलही शिंदे यांनी केला.