मुख्यमंत्री शिंदेंचा खेडच्या सभेतून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले..

रत्नागिरी :  खेडच्या गोळीबार मैदानात होणाऱ्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करारा जवाब देणार असल्याचं सांगितलं जात होतं. तसेच ही सभा कोकणातील रेकॉर्ड ब्रेक सभा असेल असं सांगितलं जात होत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे, पत्रकार परिषदांचे व्हिडीओ दाखवून या सभेतून उद्धव ठाकरे यांची पोलखोल केली जाणार आहे अशीही चर्चा होती. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांची भाषणाला सुरवात असून यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले शिंदे?
”यावेळची गर्दीची तुलना करायला आलो नाहीये. मी उत्तर द्यायला आलेलो नाही, उत्तर आरोप आणि टीकेला द्यायचं असतं. तो- तोच थैय-थैयाट तिच आदळाआपट त्याला काय उत्तर द्यायचं. त्यांच्याकडे दोनच शब्द आहेत खोके आणि गद्दर. आम्हाला उत्तर द्यायची गरज नाहीये” या सभेने तुम्हाला उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला डाग लावण्याचं काम केलं. मात्र आपण ते सोडवून आणलं. निवडणूक आयोगाने देखील आपल्या बाजुने निकाल दिला. बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहे. मात्र यांनी सत्तेसाठी आपली भूमिका बदलली.

आपण उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मी आलेलो नाही. खऱ्या अर्थाने आरोप किंवा टीकेला उत्तर देत असतात. परंतु, तोच-तोच थयथयाट तीच तीच आदळआपट, यावर काय बोलणार, मुंबईत सहा महिन्यापासून थयथयाट सुरू आहे.

मुंबईत काही बैठका झाल्या. महाराष्ट्रात देखील सर्कशीप्रमाणे राज्यभर शो होणार आहे. तेच टोमणे, तेच आरोप, तेच रडगाणं, हे सगळ तेच असतं. फक्त जागा बदलत जाते. त्यांच्याकडे दोनच शब्द आहेत. खोके आणि गद्दार. त्यांनी हिंदुत्व सोडलं. त्यांच्याविषयी मला काही सांगायची इच्छा नाही, असंही शिंदे म्हणाले.

दरम्यान, पाच मार्च रोजी खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे  यांची जाहीर सभा झाली होती. खेडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या ४० आमदारांवर सडकून टिका केली होती.