अयोध्येत मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद सर्वांची संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच मोठी घोषणादेखील केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
अयोध्येतील वातावरण राममय झालं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात वेगळीच वलय जाणवली. राम मंदिर आमच्या अस्मितेचा विचार. राम मंदिर भारतवर्षासाठी अस्मिता. राम मंदिर हे स्वप्न बाळासाहेबांनी पहिल्यांदा पाहिलं होतं. हिंदुत्वाचं प्रतिक आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या कामाला वेग आला आहे. मंदिराच कामं इतक्या वेगानं होतयं ही आश्चर्याची गोष्ट आहे. अयोध्येत आलो हा माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी इथे आलो. माझं जंगी स्वागत झालं. माझ्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचं नियोजन केलं होतं.

बाळासाहेबांच स्वप्न नरेंद्र मोदींनी पुर्ण केलं
राममंदिर राजकारणाचा विषय अजिबात नाही. माझ्या दौऱ्याचा काही लोकांना त्रास होत आहे. ते जाणून बुजून टीका करतायत. काही लोकांना हिंदूत्वाची अॅलर्जी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हिंदूत्व आहे. हिंदू धर्म सर्व धर्माचा आदर शिकवतो. मोदींमुळे देशात हिंदुत्वाचा जागर मांडला गेला. काही अल्पसंतुष्ट लोक गैरसमज पसरवत आहेत. आज भाजप शिवसेना पुन्हा सत्तेत आलं आहे. त्याचा जनतेला आनंद आहे. महाराष्ट्रात जनतेनं भाजप शिवसेनेला मतं दिली. मात्र, काही लोकांनी स्वार्थापोटी कौल नाकारला. सत्तेसाठी काही लोकांनी बाळासाहेबांच्या स्वप्नाला तिलांजली दिली. बाळासाहेबांच स्वप्न नरेंद्र मोदींनी पुर्ण केलं.

 जमिनीशी नाता असणारा मुख्यमंत्री
अवकाळी पावासामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामं करण्याचे आदेश दिले आहेत. मी ऑफिस किंवा घरात बसून काम आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. जमिनीशी नाता असणारा मुख्यमंत्री आहे. प्रभु रामाच्या आशीर्वादाने आम्हाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळालं.

विरोधकांवर टीका 

देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही आहेत. नाव नं घेता राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंनी टीका केली. आपलं सरकार नसतं तर साधूंच्या जीवाला धोका असता. अयोध्या दौऱ्याला नावं ठेवू नका. नाही तर प्रभु श्रीरम धडा शिकवतली. असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांना दिला.