मोठी बातमी! बैठकीपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य

मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज, रविवारी आंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. दरम्यान, काही तासांत या बैठकीला सुरवात होणार असून, त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? 

“दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढणार नाही, तसेच ओबीसी यांचे आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे.” त्यामुळे ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याची भूमिका घेणारे जरांगे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

आंतरवाली सराटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीवर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “सरकारचे धोरण स्पष्ट आहे. सरकारची भूमिकाही स्पष्ट आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कुठल्याही इतर किंवा ओबीसी समाजाचा आरक्षण कमी न करता, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असल्याचे,” मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.