बालविवाह: एक सामाजिक कुप्रथा!

तरुण भारत लाईव्ह ।०४ फेब्रुवारी २०२३। Child Marriage बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी Assam Government आसाम सरकारने राज्यव्यापी अभियान छेडले आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत १८०० जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत बालविवाहाच्या ४ हजार घटनांची नोंद झाली आहे. Child Marriage त्यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले. बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असतानाही आपल्या देशात बालविवाहाच्या घटना सर्रास घडत आहेत. Child Marriage विशेष म्हणजे आपल्या मुला-मुलींचा बालविवाह करून, आपण काही चुकीचे करीत असल्याचे असे विवाह करणा-यांच्या पालकांना वाटत नाही, हे दुर्दैवी आहे. Child Marriage देशातील अनेक राज्यांत बालविवाहाच्या घटना होत असताना त्याविरुद्ध कारवाई करावी, असे फक्त आसाम सरकारला वाटले, याबद्दल आसाम सरकारचे आणि राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री हेमंत बिस्वशर्मा Hemant BiswaSharma यांचे अभिनंदन केले पाहिजे.

Child Marriage अल्पवयीन मुलींशी विवाह करणा-या पुरुषांवर, बालविवाह लावणा-या धर्मगुरूंवर आणि बालविवाह सोहळ्यात  सहभागी होणा-या लोकांवर कारवाई करण्याचा इशारा आसाम सरकारने दिला होता. त्यानुसार राज्यात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. Child Marriage बालविवाहासाठी प्राथमिकदृष्ट्या मुलीचे आणि मुलाचे आईवडील जबाबदार असतात. त्यातही मुलीच्या आई-वडिलांची जबाबदारी जास्त असते. आई-वडिलांनी विवाह करण्यास नकार दिला, तर त्या लहान मुलींचा विवाह होऊच शकत नाही. Child Marriage मात्र मुलींचे आई-वडीलच सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि अन्य वेगवेगळ्या कारणांमुळे याला बळी पडतात आणि आपल्या लहान मुलीच्या आयुष्याचा आणि भविष्याचाही बळी देतात.

आपल्या देशात मुलीच्या विवाहाचे वय १८, तर मुलाच्या विवाहाचे वय २१ निश्चित करण्यात आले होते. Child Marriage वयाच्या १८ वर्षांपर्यंत मुलीचा शारीरिक आणि बौद्धिक विकास झालेला असतो. त्यामुळे विवाहासाठी १८ वर्षांचे वय योग्य असे आहे. आता तर मुलींच्या विवाहाचे वय २१ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. Child Marriage  परंतु आपल्या देशात आठ-दहा वर्षांच्या मुलींचे विवाह लावून देण्यात येतात. हा त्या मुलींवर होणारा अन्याय आणि अत्याचार म्हटला पाहिजे. या लहान मुली आपल्यावर होणा-या अन्यायाचा प्रतिकार करू शकत नाहीत, त्याविरुद्ध आवाज उठवू शकत नाहीत. आईवडिलांनी जो निर्णय घेतला, त्याच्यासमोर त्यांना मान तुकवावी लागते.Child Marriage बालवयात लग्न झालेल्या मुलींना शारीरिक संबंधांनाही सामोरे जावे लागते, ज्यासाठी त्या शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही तयार नसतात. शारीरिक संबंधांसाठी अल्पवयीन मुलींनी दिलेली अनुमती कायदा अनुमती मानत नाही. Child Marriage तिच्या अनुमतीनेही शारीरिक संबंध होत असले तरी यातील पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
Child Marriage यासंदर्भात कायदा एवढा स्पष्ट असतानाही आपल्या देशात बालविवाहाच्या घटना होतच असतात, त्या रोखल्या जात नाहीत, हे सामाजिक दुर्दैव म्हटले पाहिजे. Child Marriage पुरातन काळात तसेच स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीपर्यंत देशात बालविवाह मोठ्या प्रमाणात होत होते. नंतर मात्र या घटनांचे प्रमाण कमी झाले असले तरी बालविवाहाच्या घटना पूर्णपणे संपलेल्या नाहीत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बालविवाहाच्या घटनांचे प्रमाण कमी असले तरी महाराष्ट्रातही अशा घटना आजही होतच असतात. बिहार, आसाम, उत्तरप्रदेशसारख्या राज्यांत बालविवाहाच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. Child Marriage बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी वा त्याला आळा घालण्यासाठी कोणत्याही राज्याने आजपर्यंत एक अभियान म्हणून कारवाई केल्याचे कधी दिसले नाही. Child Marriage बालविवाहाची एखादी घटना समोर आल्यानंतर, तो विवाह रोखण्यासाठी पोलिस कारवाई करतात, पण ती कारवाई तेवढ्यापुरती असते. हा प्रकार म्हणजे आग लागल्यावर पाणी टाकून विझवण्यासारखा म्हटला पाहिजे.
आग लागल्यानंतर विझवण्यापेक्षा आग लागूच नये म्हणून सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. Child Marriage कारण लागलेली आग तुम्ही विझवली तरी तोपर्यंत व्हायचे ते नुकसान होऊन गेलेच असते. बालविवाहाच्या घटनांकडेही याचदृष्टीने पाहिले पाहिजे. Child Marriage बालविवाहाचे सामाजिक आणि अन्य प्रकारचे दुष्परिणाम आहेत. बालवयात लग्न केल्यामुळे अपरिहार्य म्हणून होणा-या शारीरिक संबंधातून अल्पवयीन मुलींना दिवस राहण्याच्या घटना घडत असतात. Child Marriage लहान मुलींची शारीरिक स्थिती गर्भारपण झेलण्यासारखी नसते. त्यामुळे त्याचा त्यांच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. गर्भातील अपत्याची वाढही योग्यप्रकारे होत नाही. Child Marriage त्यामुळे बाळंतपणात महिला तसेच शिशूच्या दगावण्याच्या घटना वाढल्या आहेत. आसाममध्ये तर बाळंतपणात अल्पवयीन मुली आणि शिशूंच्या दगावण्याच्या घटना देशात सर्वाधिक आहेत. Child Marriage भारताच्या रजिस्ट्रार जनरलने २०२२ मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये प्रतिलाख लोकसंख्येमागे बाळंतपणात अल्पवयीन मुलींच्या दगावण्याचे प्रमाण १९५ एवढे चिंताजनक असे आहे. Child Marriage शिशूंच्या मृत्यूचे प्रमाणही असेच चिंताजनक आहे. त्यामुळेच आसाम सरकारला याची गंभीरपणे दखल घ्यावी लागली आणि बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी राज्यव्यापी अभियान छेडावे लागले.
अल्पवयीन माता आणि शिशूंच्या मृत्यूच्या या घटना फक्त आसाममध्येच होतात असे नाही, तर देशाच्या अन्य राज्यांतही अशा घटना थोड्याफार प्रमाणात घडत असतात. Child Marriage मात्र आसाम सरकारने, विशेषत: मुख्यमंत्री हेमंत बिस्वशर्मा यांनी या मुद्यावर जी संवेदनशीलता दाखवली, ती कौतुकास्पद अशी आहे. हेमंत बिस्वशर्मा हे तसे काँग्रेसी, पण काँग्रेसमध्ये अवहेलना झाल्यामुळे तसेच काम करण्याची संधी न मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडत भाजपात प्रवेश केला. Child Marriage आज भाजपात स्वत:चे स्थान त्यांनी निर्माण केले आहे. माणसामध्ये कर्तृत्व असले तर तो कोणत्याही पक्षात असला तरी लोकहिताचे निर्णय घेऊन लोकहिताची कामे करीत असतो, हे हेमंत बिस्वशर्मा यांच्या उदाहरणावरून दिसून येते. Child Marriage देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असताना तसेच १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणा-या निर्मला सीतारामन् याही एक महिलाच असताना आपल्या देशात बालविवाहाच्या घटना होतात, हे आपल्या व्यवस्थेसाठी लाजिरवाणे म्हणावे लागले. Child Marriage याआधी देशाचे पंतप्रधानपद इंदिरा गांधी यांनी म्हणजे एका महिलेनेच भूषवले. आपल्या देशात महिलांनी अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे, लक्षणीय असे काम केले आहे.
Child Marriage प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथवर झालेल्या संचलनात लष्कर तसेच निमलष्करी दलांतील महिलांच्या अनेक तुकड्या सहभागी झाल्या होत्या. अनेक मुलींनी तर या संचलनात सहभागी तुकड्यांचे नेतृत्वही केले, ही बाब सर्वांसाठी प्रेरक आणि अभिमानास्पद अशी म्हणावी लागेल. Child Marriage असे असतानाही अजूनही देशातील लोकसंख्येत ५० टक्के असणा-या महिलांना अनेक क्षेत्रांत अन्याय आणि अत्याचाराला सामोरे जावे लागते, ही बाब आपल्या देशाला शोभणारी नाही. ज्या मुलींचा बालविवाह होतो, त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, घरच्या संसारात गुंतावे लागते. त्यामुळे त्यांचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक असा विकास होऊ शकत नाही. Child Marriage आज शिक्षण घेतलेल्या आणि त्यानंतर नोकरीला लागलेल्या मुलींच्या विवाहाचे वय वाढत आहे. आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहिल्याशिवाय आजकाल मुली लग्नासाठी तयार होत नाहीत. २५ ते ३० वर्षांदरम्यान मुलींच्या विवाहाचे वय आले आहे. Child Marriage अशा स्थितीत देशाच्या काही भागांत बालविवाह व्हावे, तसेच त्यांच्यावर त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने मातृत्व थोपवले जावे, हे अन्यायकारक आहे. Child Marriage त्यामुळेच ते मान्य करता येणार नाही.
बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी आसाम सरकारने जसा पुढाकार घेतला, तसाच पुढाकार अन्य राज्यांनीही घेतला पाहिजे. Child Marriage बालविवाहाच्या घटना रोखणे हे फक्त कायद्याने होणारे काम नाही. कायद्यासोबत या मुद्यावर लोकजागृतीही करणे तेवढेच आवश्यक आहे. त्यासाठी मुलींमधील शिक्षणाचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. मुलींमधील शिक्षणाचे प्रमाण जेवढे वाढेल, तेवढ्या मुली आत्मनिर्भर होतील, आपल्या पायावर उभ्या राहतील. Child Marriage मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण जेवढे वाढेल, तेवढा कुटुंबाचा विकास होईल, शिक्षित माता आपल्या अपत्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देईल. Child Marriage मुलांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देईल. त्यामुळे महिला सुशिक्षित तर घर सुशिक्षित आणि घर सुशिक्षित तर समाज आणि पर्यायाने देश सुशिक्षित असे म्हणता येईल. Child Marriage जो देश सुशिक्षित असेल त्याचा आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आसाम सरकारने तसेच मुख्यमंत्री हेमंत बिस्वशर्मा यांनी एका चांगल्या सामाजिक मुद्याला हात घालत आपल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. Child Marriage अशीच सामाजिक जाणीव अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही दाखवली पाहिजे. तरच देशातून बालविवाहासारख्या कुप्रथा बंद होतील.